पारोळा (प्रतिनिधी ) ह्या वर्षीच्या श्री बालाजी महाराज रथोत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० शिवराज्यभिषेकाच्या निमित्ताने पारोळा शहरातील तरुणींनी नुतन मंडळ स्थापन करून त्या मंडळास दुर्गा वाहिनी, दुर्गाशौर्य संघ पारोळा हे नावं सर्वानुमते देण्यात आले होते, दुर्गाशौर्य नावं देण्याचे उद्दिष्ठ म्हणजेच आदिशक्ती दुर्गादेवी संकटकालीन स्थितीत दैत्याच्या नाश करण्यासाठी आपले जवळील शस्त्रे त्रिशूल,भाला,चक्र, तलवार इत्यादीचा वापर करून संकटे पळवून लावत संकटाचा नाश करत आपले शौर्य दाखवत होते, तर आताच्या काळातील तरूणी, तसेच महिला ह्या आजच्या स्थितीला असुरक्षित आहेत त्यामुळे तर त्यांनी स्वताच्या सुरक्षेसाठी दंड चालवणे शिकणे खुप महत्वाचे आहे, दंड चालवणे हा असा प्रकार आहे की तरुणी महीला ह्या सहज संकटावर मात करत दंडच्या साह्याने आपले संरक्षण करू शकतात, हे ह्या नावाचे उद्दिष्ट पूर्ण होते.
मंडळ स्थापन करण्याचे उद्दिष्ट असे की रथोत्सवात रथाच्या पुढील लेझीम मंडळ आपापल्या मंडळातर्फे विविध प्रकारचे उपक्रम सादर करत असतात त्या उपक्रमांच्या माध्यमातून काहीतरी वेगळा संदेश हा मिळत असतो, म्हणून महीला व तरुणींना एक स्व-संरक्षणाचा संदेश आमच्या दुर्गा वाहिनी, दुर्गा शौर्य संघ ह्या मंडळातर्फे देण्यात आला आहे. तसेच ढोल-ताशाच्या माध्यमाने लेझीम देखील सादरीकरण करण्यात आले,
पारोळा रथोत्सवात दुर्गा वाहिनी, दुर्गाशौर्य संघाचा अनोखा उपक्रम
