अमळनेर (प्रतिनिधी – प्रा. हिरालाल पाटील) राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार तसेच यांच्या सह इतर सहकारी मंत्री गण उद्या दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी 9 वाजता पाडळसरे धरण दौऱ्याची पाहणी करण्यासाठी येत असल्याने प्रकल्प स्थळावर जय्यत तयारी सुरू आहे.या प्रकल्पाला मागील पंधरवड्यात सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रथमच या पाडळसरे धरणाला भेट देणार आहेत.शिवाय सोबत अनेक मंत्री उपस्थित राहणार आल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान या दौऱ्याच्या निमित्ताने अमळनेर करांना अजून काही गोड बातमी मिळते का ही उत्सुकता लागली असून मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नानी मतदार संघात विकास कामाना गती मिळाली आहे.
अजित पवारांसहीत अनेक दिग्गज मंत्री पाडळसरे धरणाला भेट देणार
