पारोळा पारोळा येथील सहजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जय हिंद प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी राणी लक्ष्मी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा डॉ अजय पाटील म्हणाले की आजचे विद्यार्थी असो किंवा कॉलेजचे मुलं असो सर्व मोबाईलच्या आहारी गेल्यामुळे मैदानावर चा त्यांचा किलबिलाट हा कमी झालेला आहे सततच्या मोबाईल वापरामुळे व तासंतास मोबाईलवर गेम खेळल्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या आरोग्याविषयी समस्या निर्माण होऊ लागल्यात म्हणून आजच्या या बालगोपाळांनी जर जास्तीत जास्त वेळ मैदानावर खेळण्यासाठी घालवला तर त्यामुळे त्यांचे आरोग्य सुदृढ होऊ शकते आणि सुदृढ आरोग्य सुदृढ मनाला उभारी देते व त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागते असे प्रतिपादन प्रा डॉ अजय पाटील यांनी केले केले
सदर क्रीडा स्पर्धांच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयातील मुख्याध्यापिका श्रीमती सुरेखा पाटील या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा .चव्हाण सर किशोर पवार हंसराज देशमुख आधी जण व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांची समायोजित भाषण झाली यानंतर प्रा डॉ अजय पाटील यांच्या शुभहस्ते क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन करण्यात आले या क्रीडा सप्ताहात धावणे, उंच उडी ,लंगडी , कॅरम ,गोळा फेक, क्रिकेट ,कबड्डी कबड्डी, लिंबू चमचा, संगीत खुर्ची, इत्यादी विविध स्पर्धां चे आयोजन करण्यात येणार आहे
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन वना महाजन यांनी केले तर आभार सागर कुमावत यांनी मानले सदर क्रीडा स्पर्धांचे पंच गुणवंत चौधरी संगीता पाटील , सरिता ठाकरे,आणि किरण विसावे हे होते संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले
सुदृढ आरोग्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळलेच पाहिजे प्रा. डॉ अजय पाटील
