पारोळा ( प्रतिनिधी ) येथे अल्पवयीन मुलीची छेड काढत ॲसिड हल्ल्याची धमकी दिल्या प्रकरणी एका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . शहरातील एका अल्पवयीन मुलीला माझ्याशी रिलेशनशिप कर अन्यथा ॲसिड फेकून चेहरा विद्रूप करेल अशी धमकी येथील संशयित भुऱ्या उर्फ नजिमखान मुख्तार खान रा कुरेशी मोहल्ला पारोळा यांने दिली पिडीत मुलीने झाला प्रकार आपल्या कुटूंब्यांना सांगितला असता पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांवर बाल लॅंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .सदर घटना दि २५ च्या रात्री ११, वाजता आरोपी हा पिडीत मुलीच्या घरासमोर जाऊन त्यानंतर त्याने मुलीस धमकावले माझ्या शी संबंध ठेव अन्यथा ॲसिड फेकण्याची धमकी दिली याबाबत पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंभीर शिंदे हे करीत आहेत
पारोळा येथे मुलीची छेड काढत ॲसिड हल्ल्याची धमकीयुवकास अटक…
