पारोळा (प्रतिनिधी ) – पारोळा येथील आई हॉस्पिटल प्रसुतीगृह व सोनोग्राफी सेंटर तर्फे परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा येथे आईं हॉस्पीटल च्या संचालिका डॉ वैशाली नेरकर यांनी दिव्यांग मुला-मुलींची मोफत आरोग्य तपासणी, मोफत औषधी व मोफत रक्त तपासणी करण्यात आले, तसेच काही मुल-मुलीं दैनंदिन जीवनातील मूलभूत सवयी बाबत अज्ञान आहेत त्या बाबत देखील आयुर्वेदिक औषध त्यांना द्यावे असा सल्ला देखील देण्यात आला, तसेच दिव्यांग मुलांचे पालक यांनी देखील मुलभूत सवयीकडे लक्ष द्यावे. असे देखील डॉ वैशाली नेरकर यांनी शिक्षकवृंद यांना सांगितले.यावेळी उपस्थित , आईं फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र पाटील, स्वाती बागडे मोहित शिंदे, प्रशिक बागुल, निलेश मराठे व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
आई हॉस्पिटल तर्फे दिव्यांग मुलांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार..
