पारोळा तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतसाठी रविवारी मतदान,प्रशासन यंत्रणा सज्ज

पारोळा (प्रतिनिधी )- तालुक्यातील ९ ग्रामपंचायत व ३ ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीच्या एकूण ३० वार्डा साठी १२० मतदान अधिकारी व ३० शिपाई , पोलीस कर्मचारी रवाना झाले आहेत. रविवार दि ५ रोजी सकाळी सात ते साडे पाच वाजेपर्यत मतदान प्रक्रिया राबवण्यात येईल. ११ पैकी २ . ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध झाल्या असुन . सर्व प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार डॉ उल्हासराव देवरे काम पाहत आहेत. रविवारी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. यावेळी पारोळा तालुक्यातील पोपटनगर , भोंडण दिंगर , – कामतवाडी , वाघ्रे- वाघ्री , मोहाडी – दहिगांव , मोंढाळे प्र उ , चहुत्रे , उडणी दिगर – उडणी खालसा , शेवगे प्र .ब , खेडीढोक , यागावांमध्ये सदरचे निवडणूक होणार आहे. तर यापूर्वी दोन ठिकाणच्या ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहे . तर या निवडणुकीत सरपंच पदासाठी २८ उमेदवार उभे ठाकले आहे तर १४९ सदस्य रिंगणात उभे असुन एका वॉर्ड साठी चार मतदान अधिकारी १ शिपाई व २ पोलिस कर्मचारी अशी पथकांची रचना केली असुन मतदाना साठी अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.अशी माहिती तहसीलदार डॉ उल्हासराव देवरे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *