.पारोळा – तालुक्यातील चबुत्रे ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल कालच जाहीर झाला. लोकनियुक्त सरपंचपदी शिवसेनेच्या अमिदाबाई सुका वंजारी तर सदस्यपदी भुषण पोपट चव्हाण, अजमल शक्रू चव्हाण, गणेश पंडीत चव्हाण, विकास ओंकार वंजारी, गोपाल दशरथ वंजारी, गणेश धनराज भिल यांनी विजय संपादन केला. या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.अमोल पाटील यांनी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व नवनिर्वाचित सदस्यांसह ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, रमेश चव्हाण, नाना चव्हाण, पुरणदास चव्हाण, आलम चव्हाण, गोकुळ चव्हाण, गणेश भिल, समाधान गायकवाड, किशोर सोनु, बळीराम कौळु, शेनपडु चव्हाण, श्रावण माणसिंग, अनिल चव्हाण, पंडित चव्हाण, देशमुख राठोड, देविदास पवार, समाधान चव्हाण, गरमक बाबु, संजय गोरबंजारा, विलास चव्हाण, आकाश चव्हाण, दिनेश चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.
चबुत्रे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा…
