पारोळा – तालुक्यातील करमाड येथील पन्नास वर्षीय महिलेने आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे तालुक्यातील करमाड येथील कल्पनाबाई राजेंद्र पाटील वय 50 यांनी दिनांक २२ रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास आपल्या स्वतःच्या घरामध्ये पुढच्या हॉल मध्ये छताला असलेला लोखंडी कडीला सुती दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना घडली आहे याबाबत आज पारोळा पोलिसात गणेश पाटील यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पो काँ प्रदीप पाटील करीत आहे.
करमाड येथील पन्नास वर्षीय महिलेचा गळफास घेऊन आत्महत्या
