पारोळा (प्रतिनिधी ) – येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दत्तकगाव उंदिरखेड येथे दिवाळीचा शिधा वाटप करण्यात आला. दिवाळीसारख्या भारतातील मोठ्या सणाला गरीबाची दिवाळी गोड व्हावी म्हणून माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांच्या प्रयत्नांतून ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या दिवाळीच्या शिधा मध्ये एक किलो साखर, एक किलो चना डाळ, रवा, डालडा आणि सोहनपापडी असे पदार्थ आहेत या शिधाचे वाटप राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे दत्तक घेतलेल्या गावी उदिरखेडे येथील गरीब वस्तीमध्ये वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचे उद्घाटन डॉ. सतीश पाटील, सौ. रेखा पाटील , जि .प . सदस्य रोहन पाटील सौ. वर्षा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर, प्रा. शिरीष सूर्यवंशी उपस्थित होते.
उंदिरखेड येये माजी मंत्री डॉ सतिष पाटील यांच्या हस्ते दिवाळीचा शिधा वाटप योजनेचे उदघाटन
