पारोळा (प्रतिनिधी ) पारोळ्यातील स्वच्छता गृहचा प्रश्न पुन्हा एैरणीवर पारोळा – शहरातील बाजारपेठ येथील एकमेव असलेल्या स्वच्छता गृहाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा यासाठी नगरपालिकेला निवेदन देण्यात आले हा प्रश्न मार्गी न लागल्यास स्वच्छता गृहा समोरच उपोषण केले जाईल असे सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी सांगितले शहरातील संपूर्ण बाजारपेठत एकच स्वच्छता गृह असून ते ही अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने बाजारपेठेतील व्यापारी व बाजारपेठेत येणाऱ्या शेतकरी नागरिकांनी या गैरसोयी बद्दल नाराजी व्यक्त केली आहे तसेच एका मुलभूत बाबी करीता नागरिकांना वेळोवेळी नगरपालिका प्रशासन ला सांगावे लागते तरी सुद्धा या गंभीर विषयाकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे .नागरिकांना लघुशंकेसाठी उघड्यावर जावे लागते उघड्यावर लघुशंकेसाठी नागरीक जातात त्याच ठिकाणी भाजीपाल्याचा लिलाव होत असतो . लघुशंके मुळे त्या ठिकाणी मोठी दुर्गधी पासरते म्हणून तिथे नेहमीच भाजीपाला विक्रेते व नागरिकांची बाचाबाची होते एखादी मोठी घटना घडु नये म्हणून पारोळा नगरपालिकेने या अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे निवेदन देते वेळी बाजारपेठेतील व्यापारी व शेतकरी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारोळ्यातील स्वच्छता गृहचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा उपोषण -उमेश पाटील
