पारोळ्यातील श्री बालाजी महाराज महाप्रसादसाठी भाविकांचे अलोट गर्दी दहा हजार भाविकांनी घेतला बैठे प्रसादाचा लाभ

पारोळा (प्रतिनिधी ) – शहराचे आराध्य दैवत श्री प्रती तिरुपती बालाजी महाराज संस्थान वतीने आयोजित ब्रह्मोत्सवाचे सांगता दिनांक ३ नोव्हे रोजी महाप्रसाद रुपी झाली. या महाप्रसादासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. जवळपास दहा हजार भाविकांनी बैठे जेवण घेऊन या प्रसादाचा लाभ घेतला १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर पर्यंत श्री बालाजी महाराजांचा ब्रह्मोत्सव पारोळा शहरात मोठ्या भक्ती भावाने व आनंदात साजरा करण्यात आला. २५ ऑक्टोबर च्या रथयात्रेला राज्यभरातून जवळपास एक लाख भाविक दाखल होत त्यांनी श्री बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. संपूर्ण खानदेशामध्ये श्री प्रति तिरुपती बालाजी महाराजांचे वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान असून मोठया भक्ती व श्रद्धेने श्री बालाजी महाराजांकडे पाहिले जाते. वहन उत्सव रथोत्सव व पालखी नंतर दिनांक ३ नोव्हेंबर रोजी श्री बालाजी महाराजांचा महाप्रसाद मंदिरा बाहेरच वितरित करण्यात आला महाप्रसाद भाविकांना बसून पोटभर देण्यात आला सुरुवातीला बालाजी महाराजांचा अभिषेक करून नैवेद्य देण्यात आला. संस्थांचे प्रमुख विश्वस्त श्रीकांत शिंपी व सौ सारिखा शिंपी यांचे हस्ते महाप्रसाद वाटप ची सुरवात करण्यात आली. श्री व्यंकटेश महाप्रसाद समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार ए टी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपअध्यक्ष रमेश भागवत, दिलीप शिरोडकर , डॉ अनिल गुजराती, दिनेश गुजराती, विश्वास चौधरी, किरण वाणी, गुणवंत पाटील, प्रवीण कोळी बापू कुंभार अमोल वाणी या महाप्रसाद समिती सदस्य व पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध व शिस्तीने वितरण करून भाविकांना पुरेपूर असा प्रसादाचा लाभ दिला. प्रसाद साठी शहरातील असंख्य तरुणांनी व बालाजी भक्त, स्वयंसेवक यांनी श्रमदान दिले. तसेच अनेक ज्ञात अज्ञात त्यांनी देखील आपला हातभार यावेळी लावला दुपारी १२ वाजे पासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मंदिर परिसरात भाविकांची यासाठी अलोट गर्दी केली होती. महाप्रसादासोबत काढा साठी देखील भाविकांनी यावेळी गर्दी केली होती. या महाप्रसादासाठी ४०० किलो बेसन पिठाचे लाडू,६०० किलो तांदूळ चार क्विंटल चवळी दहा क्विंटल पुरीसाठी गव्हाचे पीठ वापरण्यात आले होते. या महाप्रसाद साठी रोख देणगी व वस्तू स्वरूपात भेट दिली जाते. दरम्यान लाडू रूपाचा प्रसाद हा घरोघरी देखील वाटण्यात येणार असल्याची माहिती महाप्रसाद समितीच्या वतीने देण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *