माजी मंत्री पाटलाच्या हस्ते साखळी उपोषणकर्त्यांचे लिंबु पाणी पाजून उपोषण सोडले
पारोळा (प्रतिनिधी) – सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करीता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे सुरू असलेले आमरण उपोषण शासनाच्या विनंती वरून २ जानेवारी २०२४ पर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्या समर्थनार्थ पारोळा येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ शिवाजी महाराज पुताळ्या जवळ जनसेवक पी जी पाटील यांच्या नेतृत्वा खाली सुरु असलेेले साखळी उपोषण दिनांक ३ रोजी सकाळी १० वाजता माजी मंत्री डॉ सतिष पाटील , पोलिस निरीक्षक सुनिल फ्वार यांच्या हस्ते पी जी पाटील , कैलास पाटील , योगेश पाटील , दौलतराव पाटील , यांना निंबु पाणी पाजूण उपोषण सोडण्यात आले .

या वेळी एक … मराठा … लाख … मराठा या सह विविध घोषणा देण्यात आल्या .या वेळी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील , कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान , अॅड तुषार पाटील , नगरसेवक दिपक अनुष्ठान , रविंद्र पाटील , डॉ शांताराम पाटील , पतंगराव पाटील , आदि सह अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थीत होते .