पारोळा (प्रतिनिधी )- येथील महिला व बालकल्याण विभागांमध्ये अथकपणे ३४ वर्ष कार्यरत असणाऱ्या सौ.चित्रलेखा मनोहर पाटील या दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाल्या. चित्रलेखा मनोहर पाटील यांनी आतापर्यंत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका ,आणि प्रभारी बाल विकास प्रकल्पाधिकारी म्हणून काम बघितले, अंगणवाडी सेविका या पदापासून कामाला सुरुवात करत त्या बालप्रकल्प अधिकारी या पदापर्यंत पोहोचल्या होत्या, आणि बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणूनच त्या सेवानिवृत्त झाल्या. यावेळी त्यांच्या सहकार्यांनी श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पारोळा तालुक्याच्या प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी चित्रलेखा मनोहर पाटील सेवानिवृत्त
