पारोळा ( प्रतिनिधी )- शहरातील संजीवणी हॉस्पीटलच्या खाली असलेल्या फोर्सवन जिम समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने हिरो होंडा कंपनीची युनिकॉन मोटर सायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक २ रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली .ज्ञानेश्वर चुडामण पाटील रा . आनंद नगर पारोळा यांचा मुलगा रोशन ज्ञानेश्वर पाटील हा युनिकॉन मोटर सायकल क्र एम एच 19 डी ई 1314 हि दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पारोळा शहरातील संजीवणी हॉस्पीटलच्या खाली असलेल्या फोर्सवन जिम समोरून कोणीतरी अज्ञात चोरट्यांने माझ्या संमतीवाचून लवाडीच्या ईराद्याने चोरून नेली म्हणुन याबाबत पारोळा पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलिस करीत आहे .
पारोळ्यातुन मोटर सायकल लंपास
