पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा तालुक्यात फुटले राजकीय फटाके ; तामसवाडी सरपंचासह सदस्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश ! पारोळा (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे गाव असलेले तामसवाडी येथील सरपंचासह ग्राम पंचायत सदस्यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तसेच पारोळ्याचे माजी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पारोळा तालुक्यात राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली असल्याचे बोलले जात आहे. माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे गाव असलेले तामसवाडी ग्राम पंचायतमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली होती. परंतू पारोळ्याचे माजी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सरपंच मिनाबाई वसंत भिल यांच्यासह उपसरपंच मनीषा अनिल पवार आणि इतर ९ ग्राम पंचायत सदस्यांनी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पारोळ्याचे माजी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपत प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा गुरुवार सायंकाळी जामनेर येथे संपन्न झाला. दरम्यान यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, माजी जि.प. सदस्य प्रभाकरआप्पा सोनवणे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
पारोळा तालुक्यात फुटले राजकीय फटाके ; तामसवाडी सरपंचासह सदस्यांचा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश !
