पारोळा (प्रतिनिधी)- पारोळा येथील अनिल पाटील यांची कार्य करण्याची पद्धत, उत्तम संघटन कौशल्य सह नेतृत्व गुणांची दखल घेत पक्षाने तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.अनिल गुलाबराव पाटील सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.गेल्या काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे क्रियाशील सदस्य म्हणून पक्षाने दिलेली जवाबदारी लीलया पार पाडली आहे.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली व नगराध्यक्ष करण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लढलेल्या मोंढाळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकविला आहे.याच कार्याची दखल घेत पक्षनेतृत्वाने तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे.निवडीबद्दल नगराध्यक्ष करण पवार यांनी सत्कार केला.यावेळी माजी नगरसेवक पी जी पाटील, भैय्या चौधरी, बोळे सरपंच रावसाहेब गिरासे,मा सरपंच प्रभाकर पाटील, विनोद पाटील, एहमद मोबिन, रसिद मोबिन उपस्थित होते.
पारोळा भाजपच्या तालुकाध्यक्षपदी अनिल पाटील
