पारोळा (प्रतिनिधी) येथील लाडशाखीय वाणी समाज मंडळ यांच्या वतीने राम मंदिर ते राष्ट्र मंदिराच्या प्रतिष्ठापना निमित्त १६ जानेवारी ते २५ जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमा बरोबरच सोळा कुलस्वामीनी माता छप्पन भोग नैवेद्य व महाप्रसादाचे आयोजन समाज मंगल कार्यालयात करण्यात आले.
यावेळी मंगल कार्यालय येथे विद्युतरोशणाई करून महिलांनी एकत्रीत सामाईक येऊन रामरक्षा स्तोत्र पठण, हळदी कुंकवाचा कार्यक्रम , दिपोत्सव, रांगोळीतून रामा ची चित्रे साकारलीत तर मोठे राम मंदिर येथे सोळा कुलस्वामीनी माता जलाभिषेक, कुमारीका पुजन करून वादयासह पालखीतुन व बग्गी तुन कासार गल्ली, रथचौक, गांवहोळी चौक, विघ्नेश्वर गणपती मंदिर गुजराथी गल्ली, मोरफळ गल्ली या मार्गाने मिरवणुक काढून वाणी मंगल मंगल कार्यालय येथे कानुबाई फ्रेंडस सर्कल ग्रुप यांच्या वतीने गीत गायन कार्यक्रम होऊन नामदेव बंडु वाणी यांच्या हस्ते कुलस्वामी पुजन करून शरद नारायण वाणी, देविदास नामदेव तिसे, नितिन पुरुषोत्तम शिनकर, अरुण निंबा चांदवडे, शरद वामन शेंडे, सुहास वसंत येवले, संदेश माधवराव शेंडे, आरती व महाप्रसादाचे मानकरी नामदेव बंडु पिंगळे, राजेंद्र बंडु पिंगळे, दिपक मधुकर पिंगळे, स्वप्नील मधुकर पिंगळे यांच्या हस्ते छप्पन भोग आरती करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी लाडशाखीय वाणी समाज मंडळ महिलां सांस्कृतीक मंडळ व नवयुक मंडळ सदस्य यांनी परिश्रम घेतलेत
सोळा कुलस्वामीनी माता छप्पन भोग नैवेद्य सोहळा
