सांगवी फाट्याजवळ कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार.

पारोळा (प्रतिनिधी)- पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील सांगवी फाट्यासमोर कार व मोटरसायकलचा अपघातात एक जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत असे की, पारोळा कडून एरंडोल कडे मोटरसायकल क्रमांक एम एच १५ डी टी ३४३१ वर जाणारे व एरंडोल येथील हॉटेल नॅशनल पंजाब येथे मॅनेजर म्हणून कामास असलेले विशाल देविदास पाटील वय ४० राहणार एरंडोल यांना दिनांक २८ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास इंडिका कार क्रमांक एम एच 19 ए एक्स 4979 वरील अज्ञात चालकाने जबर धडक दिल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना एका खाजगी वाहनातून पारोळा कुटीर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. कुटीर रुग्णालयातून त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने शहरातील खाजगी रुग्णालयात सायंकाळी सहा वाजता दाखल करण्यात आले रात्री बारा वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलिसात चंद्रकांत नाना पाटील राहणार मोंढाळे प्र उ यांनी फिर्याद दिल्या वरून कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक फौजदार किशोर पाटील हे करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *