पारोळा ( प्रतिनिधी ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव संलग्नित किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, पारोळा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मार्फत “एक मुट्ठी अनाज” या उपक्रमाचे माजी पालकमंत्री, तसेच किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी किसान राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत राबविण्यात या येणाऱ्या उपक्रमाची त्यांनी स्तुती केली, तसेच असेच समजोपायोगी उपक्रम राबविण्याबाबत स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. किसान महाविद्यालयातील सर्व कार्यरत व्यक्तींनी या उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवक मार्फत पारोळा शहर आणि परिसरातील नागरिकांकडून धान्य गोळा करून दत्तकगाव उंदीरखेडे तसेच ज्या गोरगरिबांना या धान्याची आवश्यकता असेल त्यांना हे धान्य वितरित केला जाईल. दिवाळी सारख्या देशातील मोठ्या सणाला अनेक गरीब अन्न वाचून उपाशी राहतात. या दिवाळीला कमीत कमी एक गाव तरी उपाशी झोपायला नको, म्हणून या ही संकल्पना आपण राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत राबवित आहोत, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर यांनी दिली. यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रदीप औजेकर, प्रा. शिरीष सूर्यवंशी, भैयासाहेब पाटील, संतोष जाधव, भैयासाहेब माने व स्वयंसेवक उपस्थित होते. प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील, संचालक डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा समन्वयक डॉ. दिनेश पाटील, डॉ. योगेश पुरी यांनी या उप्रमाचे कौतुक केले.तसेच या अभियानात सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन केले.
डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते एक मुठ्ठी अनाज उपक्रमाचे उद्घाटनकिसान राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा स्तुत्य उपक्रम
