पारोळा ( प्रतिनिधी ) ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने व लक्ष्य फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे झालेल्या रोजगार मेळाव्यात हजारो युवकांनी सहभाग घेतला.या वेळी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील नामांकित कंपन्यांच्या प्रमुखांनी मतदारसंघातील युवक-युवती यांचा शैक्षणिक दर्जा पाहात मुलाखती घेतल्या.मतदार संघासह इतर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या भावनेतून जिल्हाप्रमुख तथा बाजार समिती संचालक डॉ. हर्षल माने यांनी गुरुवारी (ता. २६) रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात युवक व युवतींनी आपल्या मुलाखती दिल्या .
शिवसेना ठाकरे गटाच्या रोजगार मेळाव्यास प्रतिसाद हजारो युवकांनी दिल्या मुलाखती
