जालना (प्रतिनिधी ) मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे २ जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम !मुंबई – मराठा समुदायाला सरसकट आरक्षण देणार असतील तर सरकारला आणखी वेळ देण्यास हरकत नाही, असं मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त करीत आपलं उपोषण मागे घेतलं आहे. सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरले असुन सरकारला फक्त २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिला आहे. तर दुसरीकडे सकल मराठा समाजानं शासनाच्या आवाहनाला विनंतीला मान देऊन उपोषण मागं घेतल्याबद्दल मराठा समाजास धन्यवाद देतो, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..
मनोज जरांगेपाटील यांचे उपोषण मागे
