बहादारपुर येथे यात्रेनिमित्त कुस्त्यांची भव्य दंगल, मानाची कुस्ती ५१ हजार रुपयाची

अनेक पहेलवान हजेरी लावणार

पारोळा (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायण यात्रेनिमित्त दरवर्षी कुस्त्यांची भव्य दंगल होत असते . यावर्षी मानाची कुस्ती पुणे येथील पैलवान सौरभ जाधव व पैलवान इमरान शेख, एकता तालीम संघ शिवना ता. सिल्लोड यांच्यामध्ये होणार आहे. ही कुस्ती महाळपूर येथील सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समिती पारोळा चे उपाध्यक्ष सुधाकर पाटील उर्फ पिंटू शेठ यांच्या सौजन्याने ठेवली आहे. त्याचप्रमाणे बद्रीनारायण संस्थान कुस्ती मंडळ तर्फे दरवर्षाप्रमाणे भांडे स्वरूपात बक्षीस व रोख पैशाच्या स्वरूपात ३ हजार, , ५ हजार, , ११ हजार, १५ हजार, २१ हजार अशा रोख स्वरूपाच्या मोठ्या कुस्त्या होणार आहेत. त्यासाठी नाशिक औरंगाबाद जळगाव धुळे चाळीसगाव पुणे कोल्हापूर येथील पैलवान उपस्थित राहणार असल्याची माहिती बद्रीनारायण कुस्ती मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ. संजय भावसार यांनी सांगितले .त्यावेळेस उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील सचिव रोहिदास लोहार, मधुकर महाजन संतोष चौधरी , दामू भोई , दगडू महाजन , वामन चौधरी, अनिल सोनवणे , राजू बडगुजर , निंबा चौधरी परेश चौधरी , पांडुरंग चौधरी , चंद्रकांत पाटील , सतीश चौधरी , दिलीप चौधरी, राजू बडगुजर , अनिल माकडे सर्व कुस्ती मंडळ सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *