पारोळा येथीैल भोले विघ्नहर्ता हॉस्पिटलातील शिबिराच्या १७५ जणांना लाभ

पारोळा (प्रतिनिधी) – येथील भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलात फ्री चेकअप मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळून त्यात १७५ जणांनी लाभ घेतला.पारोळा शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील भोले विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलात दोन दिवस फ्री चेकअप मोफत आरोग्य शिबिर सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळात आयोजित केले होते.त्यात १७५ जणांनी लाभ घेतला. शिबिराचे उद्घाटन डॉ शिवचंद्र सांगळे,डॉ राहुल कुवर व डॉ मनीष पाटील यांच्या हस्ते झाले. शिबिरात मधुमेह,उच्च रक्तदाब, स्ट्रोक,हृदयरोग व छातीचे आजार यावर मोफत तपासणी तसेच हृदयरोग व मधुमेह टाळण्यासाठी मोफत मार्गदर्शन डॉ गिरीश वडगावकर व डॉ पंकज महाजन यांनी केले तर संधिवात,मणक्यांचे आजार,गुडघेदुखी,कंबर दुखी, सिकल सेल्स यांसह हाडांची ठीसुळता तपासणे,यूरिक ॲसिड व अस्थिरोग विषयी संबंधित विविध तपासण्या डॉ सुनील पावरा यांनी केल्या तसेच सी बी सी,बी जी,शुगर,ईसीजी या चाचण्यांसह गर्भवती महिला व हाय रिस्क प्रेग्नेंसीसाठी नॉन स्ट्रेस टेस्ट प्रसूती विभागाचा डॉ रणजीत पावरा यांनी तर लहान मुलांच्या सर्व आजारांवरील तपासण्या डॉ प्रिती भुषण मगर यांनी केल्या.दरम्यान,हॉस्पिटल तर्फे घेण्यात आलेले हे शिबिर गोरगरिब व गरजूंसाठी लाभदायक व मोलाचे ठरल्याचे मत अनेकांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *