पारोळ्यात अचानक आलेल्या पाऊसा मुळे नागरीकांची तारंबळ

पारोळा (प्रतिनिधी )- पारोळा शहराचा रविवार हा आठवडे बाजार असल्याने संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडासह व ढगाच्या गढ गढासह बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने नागरीकांची एकच तारंबळ उडाली दिनांक २६ रोजी सकाळ पासुन ढगाळ वातावरण होते . रविवार हा पारोळ्याचा आठवडे बाजार होता . संध्याकाळच्या सुमारास ग्रामिण तसेच शहरातील नागरीकानी बाजार हाट करण्यासाठी गर्दी केली होती . मात्र आचनक बेमोसमी पाऊस सुरु झाल्याने छोटे – छोटे दुकानादारा सह नागरीकांची एकच तारंबळ उडाली . तासभरा पासुन रिपरिप पाऊस सुरु होता नंतर पावसाने धुव्वाधार बॅटिंग केली . या मुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *