पारोळा बसस्थानकात अंधारामुळे प्रवाश्यांचे हाल …

पारोळा (प्रतिनिधी ) – येथील बसस्थानकात काम सुरू असल्याने सावधान ते बाबद प्रथम दर्शनी कुठे ही सूचना फलक नाही. तसेच रविवार हा आठवडे बाजार दिवस व लग्नसराई असल्या मुळे आणि त्यातच संध्याकाळी बसस्थानकात अंधाराचे साम्रांज्य पसरले होते.पुरेशी लाईट नसल्या मुळे प्रवाश्यांनी मोबाईलचा टार्च लावून गाडी फलक व रास्ता शोधत असताना दिसत होते .

बस स्थानक व्यवस्थापक यांच्या कडून प्रवाशांसाठी सुविधा व सुरक्षितता उपलब्ध नसल्याचे व बस स्थानकाच्या दुरुस्तीच्या कामाबाबत प्रवाश्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचे दिसून येत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *