30 नोव्हेंबरच्या आक्रोश मोर्चाततालुक्यातुन एक हजार शेतकरी उपस्थित राहणार – माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचे प्रतिपादन

पारोळा (प्रतिनिधी) – केंद्रातील व राज्यातील सरकारयांचे शेतकरी हिताच्या निर्णयाकडेदुर्लक्ष झाले आहे. राजकीय हेवेदाव्यात सरकार सुरू असूनसर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय व जगाचा पोशिंदा शेतकरीयाला न्याय मिळावा यासाठीराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटरस्त्यावर उतरला आहे.शासनाचे व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जळगाव येथे तारीख 30 नोव्हेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा होत आहे. या मोर्चात पारोळा तालुक्यातून तब्बल १ हजार शेतकरीव मतदार संघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी महिला आघाडी उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे माजी पालकमंत्री तथा बाजार समिती सभापती डॉक्टर सतीश पाटील यांनी सांगितले येथील बाजार समिती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जि प सदस्य रोहन पाटील, उपसभापती सुधाकर पाटील,बाजार समिती संचालक रोहन मोरे, संचालिका रेखा पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉक्टर शांताराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष महाजन,बाजार समिती संचालक नगराज पाटील, मनोराज पाटील, निंबा पाटील बबनराव पाटील संभाजी पाटील सुनील रामोशी, माजी जि प सदस्य हिम्मत पाटील माजी तालुकाध्यक्ष बाळू पाटील कार्याध्यक्ष शिवाजी पवार, जिभाऊ पाटील पंडित पाटील कैलास पाटील प्रमोद पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर सतीश पाटील म्हणाले की, यंदा पावसाने दडी मारून शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यात सरकारकडून शेतकऱ्यांबाबत निराशा व उदासीनता आहे.तालुक्यात सदृश्य दुष्काळ म्हणूनबरेचसे मंडळ जाहीर करणे बाकी आहे. पिक विमा बाबत निर्णय होत नाही असे असतांना देखील राज्याचे सरकार शेतकरी हिताचा निर्णयाबाबत दुर्लक्ष करीत असल्यानेराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट रस्त्यावर उतरला असून मतदार संघातील शेतकरी व पदाधिकारी यांनी आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष महाजन तर आभार कार्याध्यक्ष शिवाजी पवार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *