अमळनेर नगर परिषद मार्फत महास्वच्छता अभियान व स्वच्छ तीर्थ अभियान

अमळनेर (प्रा. हिरालाल पाटील) – आज ता.२१ रोजी सकाळी ९ वाजता अमळनेर नगर परिषद मार्फत महास्वच्छता अभियान व स्वच्छ तीर्थ अभियान मोहीम नगर पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आले.यावेळी महास्वच्छता अभियानात शहरातील नागरिक, पत्रकार, सेवाभावी संस्था, आदींना सहभागी होण्याचे आवाहन नगरपालिकेने केले होते. याप्रसंगी माजी आमदार स्मिता वाघ, माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री पाटील, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, माजी नगरसेवक संजय पाटील , सुरेश पाटील, जयदीप पवार, तुषार कासार, सूरज सराफ,नगर पालिकेचे सोमचंद संदानशिवं, संजय चौधरी,आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, हैबत पाटील, गोल्डी बिऱ्हाडे अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष चेतन राजपूत, उपाध्यक्ष आर. जे. पाटील, प्रा. हिरालाल पाटील, राहुल पाटील, अनिल पाटील, महिला हौसिंग ट्रस्टच्या सदस्या यावेळी उपस्थित होते. यावेळी स्वछता अभियानाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर वाडी चौक, बोरी नदी पात्र ह्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवीण्यात आली. नगरपालिकेचे सर्व स्वच्छता कामगार यांनी बोरी नदी पात्रातील कचरा संकलन करून वाडी चौकातही स्वच्छता मोहीम राबवली. संत सखाराम महाराज समाधी मंदिराला पाण्याने स्वच्छ करण्यात आले.नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *