शेतकरी हीत जोपासण्या साठी,शेतकरी संघ बचाव पॅनलला विजयी करा -माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील

पारोळा (प्रतिनिधी) – विचाराची लढाई विचाराने लढली पाहिजे, शेतकरी हित जोपासण्यासाठी तसेच शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी होणाऱ्या निवडणुकीत शेतकरी सहकारी संघ बचाव पॅनल लाविजयी करण्याचे आवाहन माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केले.

पारोळा तालुक्यातील वाघरे येथे शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यकर्ता व मतदार मेळावा प्रसंगी ते बोलत होते. दिनांक २७ रोजी सकाळी बालाजी मंदिर येथे प्रचार नारळ वाढविण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.दरम्यान मतदार कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी माजी खासदार अॅड वसंतराव मोरे, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट शिवसेना व भाजपा पदाधिकारी, एरंडोलचे दशरथ महाजन उपस्थित होते.यावेळी ठाकरे गट जिल्हा प्रमुख डॉक्टर हर्षल माने, भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील व माजी खासदार अॅड वसंतराव मोरे यांनी शेतकी संघाच्याकारभाराबाबत नाराजी व्यक्त करतएक हाती सत्तेला निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी पराभव करावे असे आवाहन केले.द्वेशाचे राजकारण सुरू असून शेतकरी संघाला वाचण्यासाठीसर्वांनी पुढाकार घ्यावा असे आव्हान देखील यावेळी नेत्यानी केले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन भाजपा तालुका अध्यक्ष अनिल पाटील, ठाकरे गटाचे शहर प्रमुख अशोक मराठे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट व भाजपाचे प्रमुख पदाधिकारी सह शेतकरी सहकारी बचाव पॅनलचे उमेदवार व्यक्तीशा मतदारसंघातून दिलीप पाटील, भरत पाटील, राजेंद्र पाटील ,रमेश माळी , संस्था सभासद मतदारसंघातून रावसाहेब गिरासे ,अमोल पाटील, गुलाबराव पाटील ,भाईदास पाटील, वसंतराव पाटील ,विवेक पाटील , महिला राखीव मतदार संघातून सुशिलाबाई पाटील, सीमा बोरसे , इतर मागासवर्गीय मतदार संघातून जितेंद्र पाटील , अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून तर वामन मांग , विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून आला राठोडउपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष महाजन यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *