डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा व ऑनलाईन प्रणाली मार्गदर्शन शिबिर संपन्न


पारोळा श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ व्ही एम जैन माध्यमिक विद्यालय व आप्पासाहेब यु एच करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ऑनलाईन प्रणाली शिबिर मोठ्या उत्साह संपन्न झाले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री यु एच करोडपती सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धुळे एसपी ऑफिसचे विधी तज्ञ श्री संजय निंबाळकर तसेच सौ मनीषा निंबाळकर ,सौ मनीषा पाटील, सौ माळी मॅडम तसेच पारोळा पोलीस निरीक्षक श्री सुनील पवार, माध्यमिक विभाग मुख्याध्यापक विजय बडगुजर प्राथमिक विभाग मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील व दक्षता कमिटी चे सदस्य सुवर्णा पाटील हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती व श्री बालाजीचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायबर क्राईम चेअरमन महेश थोरात यांनी केले तर मुला व मुलींना सौ मनीषा पाटील समुपदेशन तज्ञ यांनी सायबर सुरक्षा व आपली होणारी फसवणूक आपल्या व सोशल मीडियात किती अंतर असले पाहिजे त्याचे मार्गदर्शन केले तर सौ मनीषा निंबाळकर विधीतज्ञ यांनी मुलींसाठी चे कायदे व कायद्यात झालेले बदल याबद्दल सखोल मार्गदर्शन केले तर पी आय सुनील पवार यांनी सध्याच्या परिस्थितीत कशाप्रकारे गुन्ह्यात वाढ होत आहे व त्यातून कसा बचाव केला पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात श्री यु एस करोडपती सर यांनी सायबर क्राईम डिजिटल युग यात होणारी मोठ्या प्रमाणात फसवणूक याबरोबरच मोबाईलचा वापर शिक्षणासाठी किती चांगल्या पद्धतीने होऊ शकतो याचे उदाहरणासह माहिती सांगितली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक दीपक जी भावसार यांनी केले तर आभार आयोजक महेश थोरात यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी रुंद यांचे सहकार्य लाभले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *