भडगांव तालुक्यातील गिरड,आमडदे जिल्हा परिषद गटासाठी ७७ .५८ कोटी रुपयांचे विविध विकास कामाचे उद्घाटन आ . चिमणराव पाटील यांचे हस्ते संपन्न

एरंडोल (प्रतिनिधी)- आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांतुन भडगांव तालुक्यातील गिरड – आमडदे जिल्हा परिषद गटासाठी वसंतवाडी, धोत्रे, आंचळगांव, तळबंद तांडा, आमडदे, वरखेड, पिंपरखेड, अंजनविहीरे, लोण प्र.ऊ., गिरड, अंतुर्ली बु, भातखंडे, माणकी, भट्टगांव, बांबरूड प्र.ऊ., पिंपळगांव बु येथील राज्यमार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग, ग्रामिण रस्ते व गावांतर्गत मुलभुत सुविधेच्या मंजुर ७७.५८ कोटी रूपयांचा विविध विकासकामांचाभव्य भुमीपुजन व उद्घाटन सोहळा शुक्रवार, दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी आमदार चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष .अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी गेल्या स्वातंत्र्य काळापासुन आजवर एवढी विकासकामे मतदारसंघात कधीच पाहीली नाही, अनेकांनी अनेकानेक आश्वासने दिली, परंतु ती आश्वासने फक्त आश्वासने राहुन पडली, परंतु आज आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमाने या कामांची आश्वासने देवुन आज पुर्णत्वास आली, ही कामे आज तर उपयोगी आहेतच, परंतु आमच्या येणाऱ्या पिढीसाठी देखील खुप लाभदायक असुन या विकासकामांमुळे आमच्या लहानश्या गावांचा देखाव्यात मोठी भर पडली असल्याचे मत स्थानिक ग्रामस्थांनी प्रत्येक गावात व्यक्त केले. या प्रत्येक गावांना भेटी देत असतांना आजवर न झालेली विकासकामे पुर्णत्वास आलेली असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ठिक-ठिकाणी मोठ्या जल्लोषात आमदार चिमणराव पाटील सोबत आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक गावातील उर्वरित कामांना देखील गतीने पुर्ण करून एकही काम शिल्लक राहणार नाही या संकल्पनेतुन कार्य करणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी आश्वासित केले. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुदाम राक्षे, पारोळा बाजार समिती मा.संचालक चतुरभाऊ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप पाटील, जि.प.मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, जि.प.मा.सदस्य दिनकर पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रशांत पाटील, शेतकी संघाचे मा.उपाध्यक्ष सखाराम चौधरी, पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, धरणगांव बाजार समिती संचालक किरण पाटील, मा.तालुकाप्रमुख बबलु पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक रावसाहेब भोसले, आडगांव उपसरपंच डि.एन.पाटील , आमडदे येथील संभाजी भोसले, बबलु भोसले, गिरड मा.सरपंच संजु पाटील आदि सह पोलीस पाटील, ग्रामसेवक, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी, कर्मचारी, जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *