मालखेडे येथे महिला व युवती आघाडी ची शाखा स्थापन

संघटनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती शक्य- शेतकरी नेते सुनील देवरे

पारोळा (प्रतिनिधी)- महिला व युवतींनी फक्त आपल्या पती,पित्यासोबत शेतीत घाम गाळावा यात शंकाच नाही हे करत असतांना संघटनेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून आपल्या शेतातील उत्पादित पिकावर प्रक्रिया करून त्याला ऑनलाईन,ऑफलाईन सह संघटनेच्या माध्यमातून विक्री करावी त्याला संघटनेचे मार्गदर्शन सहकार्य मिळेल आणि हे होत असतांना शेतकरी शासनाच्या किंवा व्यापाराच्या भरवशावर न राहता खर्या अर्थाने सक्षम होणार आणि हे फक्त तुमच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केल्यानेच शक्य आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी केले ते मालखेडे येथे महिला व युवती आघाडी शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाला महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या राज्य महिला अध्यक्षा कल्याणी देवरे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की,आपण सर्व महिला खुप मोठी क्रांती घडवू शकतो फक्त आपल्याला योग्य दिशा,मार्गदर्शन,नेतृत्व, सहकार्य,व्यासपीठ यांची आवश्यकता आहे आणि ते आपल्याला आता महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मिळाले आहे. यावेळी कंकराज येथील आशा पाटील यांच्या सह गावातील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व पदाधिकारींना मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सपना पाटील यांनी केले सुत्रसंचालन निकिता पाटील यांनी तर आभार प्रदर्शन मयुरी पाटील यांनी मानलेमहाराष्ट्र शेतकरी संघटनेची महिला आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून वर्षा पाटील, कार्याध्यक्ष म्हणून सुनंदा पाटील, माहिती प्रमुख म्हणून सुनिता पाटील,उपाध्यक्ष म्हणून मनिषा पाटील, संपर्क प्रमुख म्हणून शितल पाटील, खजिनदार म्हणून सुनिता मुकुंदा, महासचिव म्हणून संगिता अजित,सचिव म्हणून सिंधुबाई पाटील, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून मनिषा रवींद्र, सल्लागार म्हणून योगिता पाटील, जेष्ठ मार्गदर्शक म्हणून दिपाली पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून आशाबाई पाटील.*महाराष्ट्र शेतकरी संघटनेची युवती* आघाडीत शाखाध्यक्षा म्हणून सपना पाटील, कार्याध्यक्ष म्हणून निकीता पाटील, माहिती प्रमुख म्हणून मयुरी पाटील, उपाध्यक्ष म्हणून अश्विनी देशमुख, संपर्क प्रमुख म्हणून वैशाली पाटील,खजिनदार म्हणून नेहा पाटील,महासचिव अश्विनी शरद पाटील,सचिव दिव्या देशमुख, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून चैताली पाटील, सल्लागार म्हणून लिनु पाटील,जेष्ठ मार्गदर्शक म्हणून हर्षाली पाटील, आरोग्य प्रमुख म्हणून वैशाली रावसाहेब पाटील आदिची नियुक्ती करण्यात आली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *