पारोळ्यात फर्निचर व्यापाऱ्याच्या घराला आकस्मीक आग,लाखो रुपयांचे नुकसान ..जिवित हानी टळली .


पारोळा – येथील मोठा महादेव चौका जवळ पारोळ्यातील प्रसिद्ध फर्निचर व्यापारी यांच्या घराला आकस्मीत आग लागल्याने घरातील गोडाऊन मध्ये ठेवलेले नविन फ्रिज , एल सी डी , नविन फर्निचर च्या वस्तु व घर उपयोगी वस्तु सह लाखो रुपयाचे नुकसान झाले असु्न सुदैवाने जीवीत हानी टळली आहे . तर घरामध्ये असलेले सिंलेडर बाहेर फेकल्याने मोठी हानी टळली आहे .
शहरातील प्रसिद्ध व्यापारी मनोज जगदाळे यांचे गजानन इलेट्रोनिक्स चे मोठे शॉप असुन त्यांच्या निवास स्थानी ह्या फर्निचर च्या लाखों रुपयांचा माल या ठिकाणी भरलेला होता . तीन मजली टोलेजंग इंमारती मध्ये गोडाऊन , राहण्यासाठी निवास स्थान आहे . दिनांक १३ रोजी रात्री ७ -३० ते ८ वाजेच्या सुमारास घराला आकस्मीत आग लागली हां हां करता घरात आगीने रुद्र रुप धारन केले गल्ली तील अनेकांनी शर्तीचे प्रयत्न केले मात्र अपयश आले ताबडतोब पारोळा नगरपालिकेचे बंब घटना स्थळी दाखल झाले मात्र आगीचे रुद्ररूप बघता अमळनेर , एरंडोल , धरणगांव , आदि ठिकाणच्या अग्नीशामक बंब घटना स्थळी दाखल झाले . पाण्याचा मारा सुरु करुन सुद्धा आग आटोक्यात येत नव्हती , तीन ते चार तासा पासुन आग सुरुच होती .
…मागिल दरवाज्याने काढले महिलांना …
घरातील आगीचे रुद्ररूप बघता घराच्या पुढील बाजुने आगीचे लोळ सुरुच होते घरा मध्ये महिला, घरातील मुले घरातच आडकल्याने एकच गोधळ झाला शेवटी घराच्या मागील बाजुने शिडी व दोर लावून युवकांनी बिल्डींग मधील महिलांना व परिवारातील सदस्यांना खाली उतरविले त्या मुळे जिवित हानी टळली .
….नवीन फ्रिजचे सिलेंडरचे होत होते स्फोट .. ..
तीन मजली इमारती मध्ये गोडाऊन असल्याने त्या गोडाऊन मधे नविन फ्रिज ठेवलेले होते .नविन फ्रिज
आगीच्या भक्ष्य स्थानी असल्याने फ्रिज चे गॅस सिलेडर फुटत असल्याचे आवाज बाहेर येत होते .

…युवकांनी केले मदत कार्य ..

आग लागल्याची वार्ता गावात पसरतच युवकांनी व गल्लीतील त्याच्या मित्र मंडळ नी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले .

नेमकी आग कश्यामुळे लागली हे अदयाप स्पष्ट झाले नसले तरी आग रात्री ११ – ३० पर्यत आटोक्यात आलेली नव्हती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *