पारोळा किसान महाविद्यालयात संविधान दिवस साजरा

पारोळा (प्रतिनिधी) – येथील किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत २६ नोव्हेंबर, संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत महाविद्यालयांमध्ये संविधानाची प्रत ठेवून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. त्यानंतर पारोळा शहरातील कजगाव नाका येथील संविधान स्मारक येथे तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांच्या अध्यक्षते खाली आणि शांताराम पाटील, नायब तहसीलदार, मतदान नोदणी, अड. तुषार पाटील, डॉ.हर्ष सरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग मार्फत मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. उल्हास देवरे यांनी विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीसाठी प्रोत्साहित केले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. प्रदीप औजेकर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांनी केले. यावेळी प्रा. अविनाश अहिरे, डॉ. राठोड, प्रा. शिरीष सूर्यवंशी आणि एनएसएस स्वयंसेवक मोठ्या प्रमाणत उपस्थित होते. किसान विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील यांनी कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *