पारोळा येथे स्त्री शिक्षणाचे कैवारी महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी साजरी

पारोळा (प्रतिनिधी)- येथे महाराष्ट्र राज्य माळी समाज महासंघ तर्फे स्त्री शिक्षणाचे कैवारी सामाजिक क्रांतीची मशाल पेटवणारे थोर समाज सुधारक थोर विचारवंत लेखक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा 133 वा स्मृतिदिनानिमित्तत्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माळी समाजाचे अध्यक्ष कैलास महाजन तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघ तालुका अध्यक्ष वना महाजन, प्रा.विलास महाजन सर तालुका उपाध्यक्ष परेश महाजन शहराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन व्यंकटेश फोटो स्टुडिओचे संचालक आकाश महाजनसर्वप्रथम कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष वना महाजन यांनी केले याप्रसंगी ते म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील शोषित दलित अशिक्षित व स्त्री शिक्षणासाठी फार असे मोलाचे कार्य केले आहे त्या काळात महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्यातील एक श्रीमंत व्यक्ती असून सुद्धा त्यांनी सर्व संपत्ती समाज व स्त्री शिक्षणासाठी खर्च केली त्यानंतर समाजाचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी देखील महात्मा फुले यांच्या कार्याची ओळख करून दिली किसान महाविद्यालयातील प्राध्यापक विलास महाजन म्हणाले की महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेले पुस्तके समाज बांधवांनी वाचायला हवी तसेच सत्यशोधक समाज म्हणजे काय तो समजून घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमास माळी समाजातील अशोक महाजन या युवकाच्या हस्ते क्रांती सुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले सदर कार्यक्रमास योगेश महाजन विलास महाजन बापू महाजन गणेश महाजन, विक्की महाजन मनोहर महाजन नामदेव महाजन गोरख महाजन सोनु महाजन सुरेश महाजन अशोक पाटील मधुकर आप्पा प्रमोद महाजन सर्व फुले प्रेमी समाज बांधव उपस्थित होते पारोळासदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर महाजन यांनी केले तर आभार योगेश तुळशीराम महाजन यांनी मांडले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कार्यकारणी सदस्यांनी मदत केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *