पारोळा प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेच्या तालुकाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

पारोळा (प्रतिनिधी) – जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष छोटू पवार व जिल्हा सल्लागार राजमल वाघ यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांनी माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांच्या उपस्थितीत आज दिनांक ३ रोजी पारोळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला .यावेळी छोटू पवार राजमल वाघ यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांवर विश्वास ठेवून तसेच माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत असल्याचे सांगितले आमचे नेते डॉ सतीश पाटील असून तेच वेळोवेळी आमच्या समस्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतात म्हणून सर्व दिव्यांग बांधवांनी आज एक मुखी निर्णय घेत राष्ट्रवादीत प्रवेश केला यावेळी माजी पालकमंत्री डॉ सतीश पाटील यांनी दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्या व त्यांच्या समस्यांसाठी आपण प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. केव्हाही मला हाक द्या मी तुम्हाला साथ देईल अशा प्रकारची घोषणा त्यांनी यावेळी केली. प्रसंगी एरंडोल पारोळा विधानसभा क्षेत्र प्रमुख डॉ शांताराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष महाजन जि प सदस्य हिम्मत पाटील मुंदाने सरपंच संदीप पाटील शहराध्यक्ष जितेंद्र पाटील युवक जिल्हा उपाध्यक्ष कपिल चौधरी शहर उपाध्यक्ष मन्साराम चौधरी उपाध्यक्ष ललित सोनवणे, भैय्यासाहेब माने तसेच दीव्यांग तालुकाध्यक्ष छोटू पवार जिल्हा सल्लागार राजमल वाघ जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील पारोळा शहराध्यक्ष शेख अल्ताफ शहर उपाध्यक्ष दत्तात्रय वाणी महिला शहराध्यक्ष माया बारी शहराध्यक्ष रवींद्र मंदोर शरिफ शेख मुकेश पाटील इब्राहिम अजीज कमलेश पाटील कलाबाई पाटील स्नेहल पाटील बशीर पटेल इन शरीफ नजीर रफिक गयास जावेद शेख आशाबाई पारधी महेंद्र पाटील रोशन बारी रुक्सार खाटीक दीपक कुंभार दिनेश मिस्त्री तेजस्विनी अनिश खाटीक रमेश पाटील आधी पारोळा तालुक्यातील शहरातील असंख्य दिव्यांग बंधू-भगिनी उपस्थित होते यावेळी पारोळा तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन गरजू दिव्यांगांना मोफत सायकली देण्यात येणार असल्याचे डॉ सतीश पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *