पारोळा जि प उच्च प्राथ शाळा क्र दोन येथे चौथी शिक्षण परिषद उत्साहात संपन्न


पारोळा (प्रतिनिधी ):- पारोळा येथील जि . प उच्च प्राथ शाळा क्रमांक दोन येथे केंद्राची चौथी शिक्षण परिषद अतिशय उत्साहात व गुणवत्तापुर्ण वातावरणात संपन्न झाली . परिषदेच्या अध्यक्षपदी पारोळा केंद्रीय मुख्याध्यापक रविंद्र पाटील तर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनी उपस्थित होते .
शाळा क्र २ पारोळा मुख्य बाजारात त्यात पारोळा यात्रेची शाळा परिसरात दुकाने व प्रचंड गर्दी अशा प्रतिकुल परिस्थितीत आणि ऐनवेळी कमी वेळेत शिक्षण परिषद आयोजनाची मिळालेली जबाबदारी शाळेने अतिशय छान व आपेक्षेप्रमाणे आयोजन नियोजन करून पार पाडली .
प्रास्ताविक मंगला शिवदे यांनी केले . यावेळी शाळेच्या विद्यार्थीनींनी छान ईशस्तवन व स्वागत गीत , इ ६ वी व इ ७ वी च्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व त्यावर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली . त्यांना प्रोत्साहन म्हणुन शाळा क्र ३ पारोळा मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी २०१ रु बक्षिस दिले .
शिक्षण परिषदेच्या अपेक्षित रुपरेषेनुसार निता क्षत्रिय यांनी १० दिवस गणितासाठी उपक्रमाची यशस्विता सर्वांसमोर मांडली . किशोर पाटील यांनी राज्य शैक्षणिक सर्वेक्षण माहिती व तयारी याबाबत मार्गदर्शन केले . मयुरी पाटील यांनी आय सी टी चा वापर व गुगल फार्मचा वापर याबाबत कृतीयुक्त माहिती दिली . मंगला पाटील यांनी संकलित चाचणी १ व गुण नोंदणी बाबत अभ्यासपुर्ण विवेचन केले .
परिषदेचे अध्यक्ष रविंद्र पाटील यांनी माझे शिक्षक बांधव साक्षरता सर्वेक्षण , प्रशिक्षण , १० दिवस गणित उपक्रम , साक्षरता वर्ग , विविध पेपर व परिक्षा , ग्राम पंचायत निवडणुक आदेश , बी एल ओ कामे व शाळेची अनेक ऑनलाईन कामे अशा एकत्र आलेल्या सर्वच कामांना न्याय देण्याचे काम करीत आहे .
ही कामे व यातुन निर्माण होणाऱ्या शैक्षणिक अडचणी संघटनांना सोबत घेवुन शासन दरबारी मांडल्या आहेत व आजुन मांडत राहु . तो पर्यंत मात्र आपण विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्यापासुन ते त्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्नरत राहु या असे आवाहन केले .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार
विशाल शिंपी यांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *