जगतिक कुंग फु ताइची स्पर्धेत पारोळ्याचे सिफ व्ही सुरेंद्रन यांना सिल्व्हर मेडल

पारोळा : येथील शाओलीन कुंग फु इंटर्नशनलचे असिस्टंट ग्रैंड मास्तर सिफु व्ही सुरेंद्रन यांनी तैवान येथे झालेल्या जागतिक ताइची चॅम्पियनशिप मेडल मिळविले आहे. या जागतिक स्पर्धे त जपान, चीन, कोरिया अमेरिकेसह ४३ देशातील सुमारे ६५०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. भारतातून निवड झालेल्या संघात मनोज वाडस्कर (ब्रांझ मेडल), हितेश प्रजापती (ब्राँझ मेडल) यांनीही चमकदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. भारतीय संघात तपन कुमार पंडीत (टीम लीडर), सिफु व्ही सुरेंद्रन, मनोज वाडस्कर, हितेश प्रजापती, अलेक्झांडर फर्नांडिस, दक्षा चौधरी यांचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *