आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाय म्हणत मराठ्यांनी पुन्हा उपसले सारवळी उपोषणाचे हत्यार

सरकारला दीलेली मुदत संपल्याने पारोळा येथे साखळी उपोषणाला सुरुवात

पारोळा (प्रतिनिधी) – पारोळा मराठा आरक्षणाचा मुद्दा चंगलाच तापला असून आरक्षण मिळविल्याशिवय माघार न घेण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी केलाय. मराठा आरक्षणासाठी मराठा समाजबांधवांनी सरकारला दिलेली मुदत संपली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ते अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. याचाच एक भाग पारोळा येथे बघावयास मिळतोय. शहरातील शिवतीर्थ शिवाजी महाराज पुताळ्या जवळ जनसेवक पी .जी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कैलास पाटील , डॉ शांताराम पाटील , योगेश पाटील , भैय्या पाटील , जितेंद्र पाटील , दौलतराव पाटील , ललित सोनवणे , आदि सह मराठा समाज बांधवांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. या साखळी उपोषणास माजी मंत्री डॉ . सतिष पाटील , जिल्हा बँक संचालक अमोल पाटील , अॅड तुषार पाटील , शितल अकॅडमीचे रविंद्र पाटील , संजय मराठे , प्रकाश पाटील , सचिन पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट, गाडीलोहार समाज, मराठा सेवा संघ, समस्त मुस्लिम समाज पारोळा समाज, वकील संघ, करणी राजपूत समाज पारोळा,मराठा सेवा संघ , वकिल संघटना , आदि सह विविध संघटनांनी पाठीबा दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *