राजकीय फटाक्यांचा फुसका बार क्षणातच फुटला,खोटी आमिषे दाखवून गावाचा विकास होत नसतो जि .प.सदस्य रोहन पाटलांचा पलटवार

पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा तालुक्यातील तामसवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी बिनविरोध केली होती. परंतु, त्यातील काही सदस्यांना आमिष दाखवून त्यांना अन्य पक्षात प्रवेश करण्यास भाग पाडले होते. परंतु, त्यातील दोन सदस्य पुन्हा राष्ट्रवादीत आले असून यामुळे विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न फसला आहे. तर या ग्रामपंचायत सदस्यांना खोटे आमिष दाखवणाऱ्यांना जनताच त्यांची जागा दाखवले, असे ठाम मत माजी जि.प. सदस्य रोहन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे. तामसवाडी येथील ग्रामपंचायत सदस्यांची सदस्य संख्या १५ आहे. त्यापैकी ते ५ सदस्यांना प्रवेशासाठी घेऊन गेले होते. त्यापैकी दोन सदस्यपुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय फटाक्यांचा फुसका बार क्षणातच फुटला. खोटी आमिषे दाखवून गावाचा विकास होत नसून प्रत्यक्षदर्शी लोकांची कामे करावी लागतात. तर विरोधकांनी आपण ज्या पक्षात आहोत, त्याचे आमदारकीचे तिकीट मिळवून दाखवावे. मगच माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांचा पराभव करावा, असे आवाहन माजी जि. प. सदस्य रोहन पाटील यांनी विरोधकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *