महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करणे गरजेचे -डॉ वैशाली नेरकर

पारोळा (प्रतिनिधी ) येथील लाडशाखीय वाणीसमाज व महिलां मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने पुणे येथील न्यूरोसायन्स ट्रस्ट अँड रिसर्च सोसिएटीस संलग्न समवेदना संस्था यांच्या वतीने सर्व समावेशक महिलांसाठी आरोग्य व कर्करोग पुर्व निदान तपासणी ४ नोव्हेबर रोजी १३८ महिलांची तपासणी करण्यात आली. शिबिराचा शुभारंभ डॉ. वैशाली नेरकर यांच्या हस्ते करण्यात आला तर यावेळी समवेदना संस्था पुणे येथील प्रोजेक्ट लीड डॉ. प्रज्ञा राजदीप, माधवी राऊत, आरती लोयरे, शिवानी निकम तर प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. रविंद्र नावरकर, डॉ. प्रशांत शिनकर, डॉ. विशाल शेंडे, डॉ. दिपाली शेंडे , अध्यक्षा रुपाली शिरोळे हे होते. स्त्री हि घरांचे वैभव असते आणि त्या महिलांची काळजी आपण स्वःता का घेऊ नये या उद्देशातुन कर्करोग अर्थात कॅन्सर पूर्व निदान शिबिरांचे मोफत आयोजन करण्यात आले होते . कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्षा विद्या दत्तात्रय येवले, सचिव सुनिता महेश भामरे,खजिनदार माधुरी राजेंद्र अमृतकर , वर्षा प्रकाश पुरकर ,निता योगेश नावरकर ,शितल रविंद्र टिपरे,अर्चना योगेश मैंद,योगिता सुहास येवले, हेमलता अरूण चांदवडे , रुणल भूषण कोतकर, ज्योती सचिन शिनकर ,वर्षा प्रफुल्ल कोठावदे ,सुनंदा गजानन शेंडे ,वृषाली संदेश मालपुरे, उषा शरद शेंडे ,वंदना सचिन शेंडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्तविक सुत्रसंचलन सिमा शिरोळे यांनी. तर आभार अध्यक्षा रुपाली शिरोळे यांनी माणलेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *