माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश,शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का..

पारोळा (प्रतिनिधी )- एरंडोल विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे माजी जि.प. उपाध्यक्ष.ज्ञानेश्वर आमले यांनी आमदार चिमणरावजी पाटील व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन पारोळा येथील शिवसेना कार्यालयात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश मुळे एरंडोल , कासोदा भागातीत उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे .प्रवेश प्रसंगी पं.स.मा.उपसभापती अनिल महाजन, पारोळा तालुकाप्रमुख मधुकर पाटील, बाजार समितीचे मा.संचालक प्रा.बी.एन.पाटील , मा.युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळी सरपंच बाळासाहेब पाटील, बाम्हणे येथील मुकुंदा पाटील, पिंपळकोठा येथील छोटुभाऊ मराठे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *