पारोळ्यात शेतकऱ्याचे एक लाख रुपये लंपास

पारोळा (प्रतिनिधी ) – तालुक्यातील भोंडण येथील एका शेतकऱ्याची पारोळा शहरातून एक लाख रुपये असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली.किरण गंभीर पाटील रा.भोडण (ता.पारोळा) यांनी पारोळा पोलिसांत फिर्याद दिली की, पारोळा शहरातील जय बाबाजी मोबाईल दुकानाच्या समोरुन मोटारसायकला लावलेली कापडी पिशवीत असलेले रोख रुपये एक लाख व बँकेचे पासबुक,एटीएम कार्ड,चेक बुक,आधारकार्ड व इतर कागदपत्र असे कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेले आहे.म्हणुन याबाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल होऊन पुढील तपास प्रविण पारधी करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *