शिरसमणी येथे दिनांक १८ नोव्हेंबर पासून शिव महापुराण कथाचे आयोजन

पारोळा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील शिरसमणी येथे जय महाकाल मित्र मंडळ शिरसमणी आयोजित राष्ट्रीय संत परमपूज्य. ललितजी नागर महाराज ( शेंदवा मध्य प्रदेश) यांचे भव्य संगीतमय छत्रपती शिव महापुराण कथा शनिवारी १८ नोव्हेंबर ते शुक्रवार दिनांक २४ नोव्हेंबर पर्यंत रात्री ८ ते ११ या वेळेत होणार आहे. शनिवारी दि. १८ रोजी भव्य मिरवणूक व कलश यात्रा दुपारी 3 वाजता निघणार आहे. तर शनिवारी दिनांक २५ रोजी सकाळी ८ _ ३० ते १o – ३० वा. श्री ह.भ.प.अंकुर महाराज साखरे( गेवराई बीड ) यांचे भव्य जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रम आयोजित केला आहे. तसेच दिनांक २५ रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी भाविकांनी या कथेचा, कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *