भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

पारोळा(प्रतिनिधी) – भारतीय स्वातंत्र संग्रामातील एक अग्रणी नेता,सुविद्म व सुसंस्कृत जगन्मान्य मुत्सद्दी राजकारणी, भारतीय इतिहास स्वतः अभ्यासुन Discovery of India हा ग्रंथ लिहिणारे भारताचे प्रथम पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती निमित्त त्यांना पारोळा तालुका काँग्रेस कमिटी चा वतीने तालुका अध्यक्ष पिरनकुमार अनुष्ठान यांनी त्याचा प्रतिमेला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.प्रत्येक क्रृतज्ञ भारतीय या महान दिवंगत नेत्याला कदापी विसरणार नाही. चाचा नेहरू नेहमी म्हणत आजची मुलं हि उद्याचा भारत घडवतील बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.. ह्या शब्दाला साजेसा कार्याला व हे तुमचे आमचे स्वप्न साकार करण्यासाठी नियोजन बद्ध प्रयत्न करणाऱ्या या थोर नेत्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष पी.एन.पाटील, गणेश बिचवे, बापूसाहेब वाडीले,भरत चौधरी, तुकाराम पाटील, जितेंद्र वानखेडे,किरण आठवले, दिपक चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *