शेळावे बु येथे बंद घरातून लाखाचा ऐवज लंपास

पारोळा (प्रतिनिधी )- पारोळा तालुक्यातील शेळावे बुद्रुक येथे बंद घरातून सुमारे एक लाख रुपयांचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक १८ रोजी दुपारचा सुमारास घडली.याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेळावे बुद्रुक येथील किरण प्रल्हाद बिऱ्हाडे यांच्या घरी दिवाळीनिमित्त नातेवाईक आले होते,त्यांनी स्वयंपाक घरातील एका बॅगेत कानातले टोंगल, कर्नफुल,रिंग पेंडल,चैन असे सुमारे एक लाख रुपये किमतीचे विविध वस्तू ठेवलेले होते.ते व घरची मंडळी दिनांक १८ रोजी दुपारी बारा वाजता कामानिमित्त घराची कडी लावुन त्यांचा नातेवाईकांकडे अमळनेर येथे गेले होते,त्यानंतर बंद घराचा फायदा घेत दुपारी बारा ते चार वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटे घरात असलेल्या बॅगेतील सोन्याचे दागिने त्यात ५४ हजाराची गळ्यातील चैन,१५ हजाराचे कानातले टोंगल,९ हजाराचे कर्णफुले,९ हजाराचे सोन्याचे वेल,६ हजाराची सोन्याची रिंग,६ हजाराचे गळ्यातील पेंडल असे एकुण ९९ हजाराचा मुद्देमाल चोरून पसार झाले.याबाबत किरण प्रल्हाद बिऱ्हाडे यांच्या फिर्यादिवरून पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *