पारोळा भाजपा शहराध्यक्षपदी नगरसेवक मनीष पाटील यांची निवड..

पारोळा (प्रतिनिधी) – शहराचे तीन वेळा निवडून आलेले मातब्बर युवा नगरसेवक मनीष पाटील यांची भाजपा शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेश पाटील,भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष ह भ प ज्ञानेश्वर महाराज पाटील जळकेकर , पारोळा एरंडोल विधानसभा निवडणूक प्रमुख अध्यक्ष करण पाटील, भाजप तालुकाध्यक्ष अनिल पाटील,नगरसेवक भैय्या चौधरी, चाळीसगाव पंचायत समिती माजी सदस्य रवींद्र चौधरी, संकेत पाटील ,कैलास पाटील ,प्रसाद महाजन ,दिनेश लोहार, मुकेश पाटील आदी मान्यवर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षपदी मनीष पाटील यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा सोहळा भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालय वसंत स्मृती येथे संपन्न झालात्यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *